आपण नुसते म्हणतो, साला
कशाला वेळच नाहीये!
निवांत उठायला,
एका बैठकीत पुस्तक संपवायला,
दोन तासांच्या वामकुक्षीला.
आपण नुसते म्हणतो.
एका बैठकीत पुस्तक संपवायला,
दोन तासांच्या वामकुक्षीला.
आपण नुसते म्हणतो.
आपण नुसते म्हणतो, रोजच्या
धकाधकीत छंदच हरवलाय!
गाण्याचा, वाजवण्याचा,
चित्र रेखाटण्याचा,
धुंद नर्तनाचा.
आपण नुसते म्हणतो.
गाण्याचा, वाजवण्याचा,
चित्र रेखाटण्याचा,
धुंद नर्तनाचा.
आपण नुसते म्हणतो.
आपण नुसते म्हणतो, कौटुंबिक
संवाद हरवत चाललाय!
वडीलधाऱ्यान्शी,
मुलाबाळांशी,
एकमेकांशी.
आपण नुसते म्हणतो.
वडीलधाऱ्यान्शी,
मुलाबाळांशी,
एकमेकांशी.
आपण नुसते म्हणतो.
आपण नुसते म्हणतो, कुणाला फिकीरच नाहीये!
देशाच्या प्रगतीची,
नियमांची,
समाजाच्या हिताची.
आपण नुसते म्हणतो.
पण कधी करायची संधी आली तर?
थोडीशी काळजी,
थोडासा त्याग,
तोही आपल्याच लोकांसाठी?
तेव्हा मात्र खांदे उडवून आपण म्हणतो, 'एवढ्याने काय होतंय?'
देशाच्या प्रगतीची,
नियमांची,
समाजाच्या हिताची.
आपण नुसते म्हणतो.
पण कधी करायची संधी आली तर?
थोडीशी काळजी,
थोडासा त्याग,
तोही आपल्याच लोकांसाठी?
तेव्हा मात्र खांदे उडवून आपण म्हणतो, 'एवढ्याने काय होतंय?'