देउळिचा देव, मोठाची गोजिरा
पायीच्या खडावा, सोनियाच्या
तलम ती वस्त्रे आणि आभूषणे
मूर्ती ती झळाळे, पाषाणाची
तयाच्या देउळी, रोज रोषणाई
पूजाअर्चा घाई, रात्रंदिन
परी तो का दिसे, कावराबावरा?
कुठल्या विचारा करितसे?
देव म्हणे मला दिसे विसंगती
ऐकती, वागती विपरीत
देव म्हणे लोका सांगे मी विरक्ती
रास दक्षिणेची, माझ्यापुढे
देव म्हणे द्यावा भुकेल्यासी घास
पक्वान्नांचे ताट नैवेद्याला
कष्ट हाच देव सांगे तरी दारी
उभे भिक्षेकरी कायमचे
देव म्हणे मनी, नका धरू लोभा
नवसाने देवा मोहविती
स्वच्छ मन हेच सोवळे पुरेसे
मन काळे, अंगी पितांबर
देव म्हणे सेवा करा शोषितांची
माया जमविती तीर्थक्षेत्रे
देव हाच धंदा, देव व्यवसाय
अर्थाचा अनर्थ कोणी केला?
दुर्दैवच सारे आपण करंटे
देव काय सांगे समजेना
पायीच्या खडावा, सोनियाच्या
तलम ती वस्त्रे आणि आभूषणे
मूर्ती ती झळाळे, पाषाणाची
तयाच्या देउळी, रोज रोषणाई
पूजाअर्चा घाई, रात्रंदिन
परी तो का दिसे, कावराबावरा?
कुठल्या विचारा करितसे?
देव म्हणे मला दिसे विसंगती
ऐकती, वागती विपरीत
देव म्हणे लोका सांगे मी विरक्ती
रास दक्षिणेची, माझ्यापुढे
देव म्हणे द्यावा भुकेल्यासी घास
पक्वान्नांचे ताट नैवेद्याला
कष्ट हाच देव सांगे तरी दारी
उभे भिक्षेकरी कायमचे
देव म्हणे मनी, नका धरू लोभा
नवसाने देवा मोहविती
स्वच्छ मन हेच सोवळे पुरेसे
मन काळे, अंगी पितांबर
देव म्हणे सेवा करा शोषितांची
माया जमविती तीर्थक्षेत्रे
देव हाच धंदा, देव व्यवसाय
अर्थाचा अनर्थ कोणी केला?
दुर्दैवच सारे आपण करंटे
देव काय सांगे समजेना
khup chhan kavita, aawadli
ReplyDeletethank you Deepti
Delete