कृष्ण राजा प्रतिपालक तो, अबलांचा रक्षणकर्ता
संरक्षणार्थ झाला सोळा सहस्रांचा भर्ता
राजा होता रामही, जाणून प्रजेचे मर्म,
एकुलती पत्नी त्यागून त्याने जपला राजधर्म
विचार नसतो अधांतरी, हवे स्थल काल परिमाण,
ज्याला जे भावेल ते त्याने घ्यावे तत्त्वज्ञान
ब्राह्मण म्हणून जन्मला, पण परशुराम झाला योद्धा
आणि राज्य सोडावे अशी इच्छा झाली गौतम बुद्धा,
अर्जुनाला दिले ज्ञान गवळ्याच्या पोराने,
महाकाव्य रामायण रचले, वाल्या कोळ्याने
नाकारुनिहि मळल्या वाटा, मिळे अमरत्वाचा मान

रामाने लोकभयाने वंशज नाकारला ,
यशोदेने कुशीत घेऊन कान्हा वाढविला
पुत्रेछेने पार्वतीने घडविली गणेशमूर्ती,
जनकासाठी पेटीमधुनी कन्या आणे धरती
अनेक तत्वे - अनेक विकल्प, व्यापक करूनि भान

वेद, शास्त्रे, असंख्य पुराणे, महाकाव्ये रसाळ,
ऐकून, वाचून, लिहून, सांगून, लोटला किती काळ
असंख्य माणिक, असंख्य मोती, ज्ञानसागरी मंथन
तरीही त्यांवर 'मी म्हणतो ते खरेच' याचे बंधन?
ज्ञानाच्या ओझ्याने लवते, कितीही ताठ हो मान,
अन अधिकाधिक व्यापक होते ते समर्थ तत्त्वज्ञान

No comments:
Post a Comment