लांब रांग अन कार्ड हाती, भाव भांबावलेला
शंका त्याच्या समजून घेऊन कुणी धावे मदतीला
विजयी चेहरा, हाती शंभर, ओठी हसू निखळ
नोटा झाल्या कमी आणि माणसे आली जवळ
आज रोख अन उद्या उधारची दुकानातली पाटी
मालकाच्या माणुसकीने आज ठरवली खोटी
म्हणे अडचण साऱ्यांचीच, उद्या कमविन कि बक्कळ
नोटा झाल्या कमी आणि माणसे आली जवळ
सुट्ट्या विसरून करती काम ते नेक कर्मचारी
भूक विसरुनी पार पाडती चोख जबाबदारी
शक्य असे ते पुरे करावे हीच मनी तळमळ
नोटा झाल्या कमी आणि माणसे आली जवळ
आज जमिनीवरी उतरले सर्व उच्च नीच
जड खिसा - होता हलका तो, गळून पडे कवच
जणू विसरल्या माणुसकीचे व्हावे दर्शन नितळ
नोटा झाल्या कमी आणि माणसे आली जवळ
शंका त्याच्या समजून घेऊन कुणी धावे मदतीला
विजयी चेहरा, हाती शंभर, ओठी हसू निखळ
नोटा झाल्या कमी आणि माणसे आली जवळ
आज रोख अन उद्या उधारची दुकानातली पाटी
मालकाच्या माणुसकीने आज ठरवली खोटी
म्हणे अडचण साऱ्यांचीच, उद्या कमविन कि बक्कळ
नोटा झाल्या कमी आणि माणसे आली जवळ
सुट्ट्या विसरून करती काम ते नेक कर्मचारी
भूक विसरुनी पार पाडती चोख जबाबदारी
शक्य असे ते पुरे करावे हीच मनी तळमळ
नोटा झाल्या कमी आणि माणसे आली जवळ
आज जमिनीवरी उतरले सर्व उच्च नीच
जड खिसा - होता हलका तो, गळून पडे कवच
जणू विसरल्या माणुसकीचे व्हावे दर्शन नितळ
नोटा झाल्या कमी आणि माणसे आली जवळ