Tuesday, 8 November 2016

गिधाडं

मरतो गरीब शेतकरी -
उद्वस्त कुटुंबाचे अश्रूही सुकतात
भविष्यात वाढून ठेवलेल्या जाळाने.
पण कॅमेरा हटत नाही मागे -
बिचाऱ्यांच्या उरल्या सुरल्या रक्ताचेही पाणी होईपर्यंत. 
मरतो शूर सैनिक -
कणखर कुटुंबाच्या पाणावलेल्या डोळ्यांमध्ये
भरून राहिलेला असतो अभिमान.
पण हटत नाही समोरचा माईक
जोपर्यंत कुरूप प्रश्नांनी
सार्वजनिक होत नाही त्यांचे वैयक्तिक दुःख.
उदात्त हेतूचा मानभावी बुरखा पांघरून
जखमांवरच टोच मारून
पोट भरणाऱ्यांना
गिधाडं का म्हणू नये?


No comments:

Post a Comment