रेशमाची अळी
बाहेर येऊन रेशमाची अळी
तुतीची पाने खाते खुळी
खाऊन खाऊन होते सुस्त
म्हणते झोप काढू मस्त
उबदार कोष लागते विणू
त्या धाग्याला रेशीम म्हणू
उकळते पाणी, मग अळीचे विरणे
रेशमाची बनतात वस्त्रे - प्रावरणे
क्वचित चुकवून माणसाची नजर
कोषातून पतंग उडतो निर्भर
मधमाशी
उंचावर लटकलेले मधाचे पोळे
थबथबलेले पिवळे काळे
कामकरी माशांना भलतेच काम
राणी मधमाशी करते आराम
अंड्यांमागून घालते अंडी
जन्माला येतात झुंडी च्या झुंडी
लाडक्या बाळाला जास्तीचा खाऊ
राणीपद करती एकीलाच देऊ
कामासाठी बाकीच्यांचा जन्म
हिंडून फुलांतून आणतात अन्न
षटकोनांत भरतात गोड गोड खाऊ
म्हणतात हिवाळ्यात पोटभर जेऊ
लिंपून टाकतात मेणाचा थर
ते पाहून माणसे चढतात वर
गोड गोड मध घेतात काढून
हिवाळ्यापुरता देतील ना ठेवून?
बाहेर येऊन रेशमाची अळी
तुतीची पाने खाते खुळी
खाऊन खाऊन होते सुस्त
म्हणते झोप काढू मस्त
उबदार कोष लागते विणू
त्या धाग्याला रेशीम म्हणू
उकळते पाणी, मग अळीचे विरणे
रेशमाची बनतात वस्त्रे - प्रावरणे
क्वचित चुकवून माणसाची नजर
कोषातून पतंग उडतो निर्भर
मधमाशी
उंचावर लटकलेले मधाचे पोळे
थबथबलेले पिवळे काळे
कामकरी माशांना भलतेच काम
राणी मधमाशी करते आराम
अंड्यांमागून घालते अंडी
जन्माला येतात झुंडी च्या झुंडी
लाडक्या बाळाला जास्तीचा खाऊ
राणीपद करती एकीलाच देऊ
कामासाठी बाकीच्यांचा जन्म
हिंडून फुलांतून आणतात अन्न
षटकोनांत भरतात गोड गोड खाऊ
म्हणतात हिवाळ्यात पोटभर जेऊ
लिंपून टाकतात मेणाचा थर
ते पाहून माणसे चढतात वर
गोड गोड मध घेतात काढून
हिवाळ्यापुरता देतील ना ठेवून?
No comments:
Post a Comment