Wednesday, 26 May 2021

चारोळ्या

 

४ मे २०२१

प्राजक्ताची चार फुले
आज रस्त्यातच दिसली.
वेचणाऱ्या हातांना शोधता शोधता
वाट चुकली असणार रात्री.

 

२९ एप्रिल २०२१

खात्री आहे त्यांना
माणुसकीचा प्रत्येक कोंब
घुसमटून गेलाय.
नाहीतर एका तरी चांगुलपणाची
ब्रेकिंग न्यूज आली असती.

 

२६ एप्रिल २०२१

बाहेर अंधुक वाटा आणि
अंगावर सतत काटा आहे;
घराचे घरपण टिकवण्यात
आज लहानग्यांचा वाटा आहे.

No comments:

Post a Comment