वर्ष उलटून गेलंय, आता
थांबव लाडात येणं,
बंद घरात दडून बसणं एवढंच नसतं जगणं
प्रथम मिठीत घेतलंस तेव्हा
कोंडला होता श्वास,
चढला होता ज्वर आणि सर्वत्र तुझाच भास.
नव्याची नवलाई समजून तेव्हा
हसले होते लोक,
मलाही नंतरच कळला तुझ्या मनाचा रोख.
टाकून जीवघेणे कटाक्ष घायाळ
केलंस मला,
भान हरपून बघतच राहिले तुझ्या बदलत्या कला.
भरून या वसुंधरेला घेतलंयस
पुरतं कह्यात,
मात्र केवळ तुझाच विचार आता नाही माझ्या मनात
उघड तुझी मगरमिठी मला घेउ
दे मोकळा श्वास,
पुन्हा स्वच्छंद मुग्ध जीवन जगण्याची मज आस.
आपले नाते वेगळे त्याची
आपली जागा हो ना?
पण माझे अस्तित्वच व्यापण्याआधी थोडा विचार करो ना!
No comments:
Post a Comment