आजोबांचा मित्र एकदा आला होता घरी,
आजोबाच समजून मी रेलले अंगावरी
फाजितीने माझ्या झाला हास्याचा स्फोट
पण मित्राकडे नव्हते कधीच संशयाचे बोट
होतो पाचसहा जण, पण एकच मिळाली रिक्षा
मग मांडीवरच बसण्याची आम्हा मुलांना शिक्षा
दंडावरच्या पकडीत सुद्धा नव्हती कसली खोट
काका मामांकडे नव्हते कधीच संशयाचे बोट
खेळायला घेऊन जात शेजार पाजारचे काका,
कुठल्या कुठे असायचो आम्ही, मैदाने नि बागा
आई बाबांच्या परवानगीची लागत नव्हती नोट
शेजारच्यांकडेही कधीच नव्हते संशयाचे बोट
शाळा, बस, घरातही आज, कुणी शोधत असतो संधी
विकृत नजरेला बालक दिसते - नर किंवा मादी
वासनेनी वात्सल्याचा घेतला आहे का घोट ?
प्रत्येकावरच रोखलेले संशयाचे बोट
आजोबाच समजून मी रेलले अंगावरी
फाजितीने माझ्या झाला हास्याचा स्फोट
पण मित्राकडे नव्हते कधीच संशयाचे बोट
होतो पाचसहा जण, पण एकच मिळाली रिक्षा
मग मांडीवरच बसण्याची आम्हा मुलांना शिक्षा
दंडावरच्या पकडीत सुद्धा नव्हती कसली खोट
काका मामांकडे नव्हते कधीच संशयाचे बोट
खेळायला घेऊन जात शेजार पाजारचे काका,
कुठल्या कुठे असायचो आम्ही, मैदाने नि बागा
आई बाबांच्या परवानगीची लागत नव्हती नोट
शेजारच्यांकडेही कधीच नव्हते संशयाचे बोट
शाळा, बस, घरातही आज, कुणी शोधत असतो संधी
विकृत नजरेला बालक दिसते - नर किंवा मादी
वासनेनी वात्सल्याचा घेतला आहे का घोट ?
प्रत्येकावरच रोखलेले संशयाचे बोट
No comments:
Post a Comment