ती शाळेतून येता घरी, लगेच गप्पा फोनवरी
गंमत बघू कि कान धरू? अळीच होतंय फुलपाखरू
उलट उत्तरे, वाद घालणे, कारण नसता चिडणे, रुसणे
आवर म्हणू कि गृहीत धरू? अळीच होतंय फुलपाखरू
दोस्त मंडळी अवतीभवती, गंमत, खोड्या, दंगा करिती
सामील होऊ कि बंदी करू? अळीच होतंय फुलपाखरू
आधी दिसत नसे फारसा, आता सतत हवा आरसा
दटावू कि कौतुक करू? अळीच होतंय फुलपाखरू
बालपणातच असता पाऊल, मुग्धपणाची लागे चाहूल
लहान म्हणू कि मोठी धरू? अळीच होतंय फुलपाखरू
मैत्रिणीच्या कुजबुज कानी, असेल काही गुपित मनी?
सोडून देऊ कि विचारू? अळीच होतंय फुलपाखरू
छोटासा पण कोष सुरक्षित, जग नसेल तसे कदाचित
भीती घालू कि सक्षम करू? अळीच होतंय फुलपाखरू
बाहेर पडता या कोषातून, हुरहूर वाटे फार मनातून
काळजी करू का धीर धरू? अळीच होतंय फुलपाखरू
तयार व्हावे तिने मनाने, पेलण्यास नवी आव्हाने
मोकळ सोडू कि पकडून धरू? अळीच होतंय फुलपाखरू

No comments:
Post a Comment