प्रत्येकाचाच मनात असते का एक न भरलेली जखम?
आणि प्रत्येक जणच सांभाळत असतो का थोडे दुखावलेपण?
प्रत्येकाचाच मान असतो का त्या जखमेहून मोठा?
चेहऱ्यावर आणतो बेफिकिरीचा आव खोटा खोटा
अपमान, गैरसमज, विश्वासघात जाऊन लागतो खूप आत
कारण मन असते तेवढेच हळवे, जेवढी असते मान ताठ
कधीतरी येतेच या जखमेतून एक दुखरी कळ
ओलावतात डोळे आणि गळून जाते बळ
अशा वेळी समजवावे मनाला, अनुभव घ्यावा, मोठे व्हावे
चवीपुरता राहू दे वण पण आयुष्य कडू न होऊ द्यावे
No comments:
Post a Comment