Wednesday, 21 January 2015

कार वाले पुणेकर

कार वाले पुणेकर फार लेकुरवाळे
गाडी चालवत असतानाही मांडीवरती बाळे

इच्छित स्थळ गाठायचे एकाच त्यांचे लक्ष्य
सिग्नल होतोय लाल पिवळा तिथे कशाला लक्ष?

एक दोघांनी जायचे वाहन नव्हेच मुळी बाईक
तिघे तरी हवेतच कारण हे पर्यावरणाचे पाईक

इकडूनच जायचे तिकडूनच यायचे हि तुमची अंधश्रद्धा
फुटपाथ वरही गाडी घालेल तोच पुणेकर खंदा

हेल्मेट घालणे, सीट बेल्ट लावणे हि भ्याडपणा ची लक्षणे
नियम केलाच कुणी तर हे मोर्चे काढतात म्हणे

सांगू नका आम्हाला कि यांना शिस्त नाही
सात समुद्र ओलांडल्यावर जमते सर्व काही

आपल्या घरीच का मग अशी नियमांची अवज्ञा
आपणच घडवायचाय आपला समाज अधिक सांगणे न लगे सुज्ञां 

No comments:

Post a Comment