Wednesday, 21 January 2015

एक दिवसाचे म्हातारपण

एक दिवसाचे म्हातारपण आज मी जगले,
माझी कवळी नेउन दुरुस्तीला, बाहेर पडले सगळे

एक दिवसाचे म्हातारपण आज मला कळले
पोळी कुस्करून आमटीत बुडवून जेव्हा मी प्यायले

एक दिवसाचे म्हातारपण गम्मत सांगून बसले
चिवडा कुटून खाणार्यांना मीच होते हसले.

एक दिवसाचे म्हातारपण माझ्या नातवंडांना हि दिसले
आज तू खरी आजी दिसतेस असे त्यांनी म्हटले

एक दिवसाचे म्हातारपण धूम पळून गेले
नवी कवळी घेऊन जेव्हा मी घरी परत आले 

No comments:

Post a Comment