Wednesday, 28 January 2015

पुणेरी बस

पुणेरी बस (मार्च २०१३)

इंग्लंड मधून पुण्याला आलो. सर्व स्थिरस्थावर होईपर्यंत - महिने गेले. मुलींच्या शाळा सुरु झाल्या आणि नवऱ्याचे ऑफिस. बर पुणे म्हटलं तरी आम्ही राहायला पाषाण मध्ये. त्यामुळे खर्या पुण्यात किवा पुणेरी भाषेत 'गावात' जायचे असेल तर वाहन काय हा प्रश्न . रिक्षा, टैक्सी करायची म्हटली तर १००-१५० रुपयाला फोडणी. त्यामुळे सहज बाहेर पडायचे किवा गावात जायचे तसे खर्चिक. आजूबाजूचा भाग थोडाफार माहितीचा झाला आणि कळले कि डेक्कन ला जायला पाषाण हून एक बस आहे. मग ठरवले कि आता बस ची माहिती करून घ्यायची.
काही वर्षे uk मध्ये राहिल्यामुळे शिस्तशीर बस वाहतुकीची सवय लागलेली त्यामुळे बस स्टोप कुठे आहे असे सरळ विचारता तशी पाटी किवा बांधीव स्टोप ची शोधाशोध सुरु केली. दिसत नाही म्हटल्यावर शेवटी विचारले. एकाने पाच सात माणसें एका झाडाच्या सावलीत उभी होती तिकडे बोट दाखवले. मग मीही त्याच झाडाच्या सावलीत जाऊन उभी राहिले.झाड हाच स्टोप असल्याने त्याचे नाव, किवा तिथे थांबणाऱ्या बसेस किवा त्यांच्या वेळा याची काही माहिती असण्याचा काही संबंधाच नव्हता.मी एकाला 'आता कितीची बस आहे' असा निरर्थक प्रश्न विचारून पहिला. उत्तर अर्थातच 'माहित नाही' असे मिळाले. दुसर्या एकाने ' आताच खाली गेली आहे, तीच बहुतेक येईल' अशी माहिती दिली. ठीक आहे. मग मीही वाट पाहत उभी राहिले. -१० मिनिटे गेल्यावर बस येताना दिसली. एव्हाना बर्यापैकी गर्दी झाली होती. आमच्या फुटपाथ च्या कडेला बर्याच गाड्या पार्क केलेल्या असल्याने म्हणा किवा स्टोप वरील गर्दी पाहून, बस ड्रायव्हरने चतुराईने बस बरीच पुढे नेऊन उभी केली.मग 'survival of the fittest ' च्या तालावर जी लोक पटापट धावत जाऊन चढू शकली त्यांना घेऊन बस निघाली. मुंबईत लहानाची मोठी झालेली असल्यामुळे मी चपळाईने त्या बस मध्ये चढले.
बस निघाली. दर स्टोप मागे गर्दी वाढत होती.- स्टोप नंतर एका बर्यापैकी महत्वाचा स्टोप आला. स्टों वर एक युनिफोर्म वाले वाहक काका उभे होते. ते आतील गर्दीला 'पुढे व्हा , सरका पुढे, ए। बाळ हो पुढे अश्या सूचना बाहेरूनच देत होते. आणि बाहेर उभ्या असलेल्या लोकांची आत यायची सोय करत होते. काही दिवसांच्या प्रवासानंतर समजल कि त्यांची याच कामासाठी त्या स्तोप वर कायमची नेमणूक झाली होती . एक दिवस तर कमालच झाली . डेक्कन चा बोर्ड पाहून मी बसमध्ये चढले . थोडा वेळ प्रवास झाल्यावर वाहक म्हणाले आता इथे उतारा, ही बस 'म्हसोबा गेट पर्यंतच जाणार आहे. मी म्हणाले 'अहो पण तुम्ही डेक्कन चा बोर्ड लावला आहे. तेव्हा त्याचे उत्तर म्हणून ते म्हणाले , अहो ताई कुठलातरी बोर्ड लावायला पाहिजे '. आता काय बोलाल? त्या निमित्ताने मला 'म्हसोबा गेट' नावाचा एक भाग आहे आणि तो कुठे आहे याचे ज्ञान झाले हि जमेची बाजु.
पुण्यातील एकूणच ट्राफिक आणि प्रदूषणाची समस्या कमी व्हावी या हेतूने आणि लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरावा यासाठी 'पुणे बस डे ' असा एक दिवस मध्ये साजरा केला गेला . त्या दिवशी शेकड्यांनी नवीन/ज्यादा बस रस्त्यांवर धावल्या. लोकांनी स्वतःची वाहने वापरता बस चा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यासाठी जोरदार तयारी झाली , सगळ्या बसेस चा मार्ग, नंबर, इत्यादी माहिती रोज पेपरात येत होति. तो दिवस उजाडला . बऱ्याच मान्यवरांनी बसने प्रवास केला. नोकर्दारांनीही आपली वहाने बाहेर काढता प्रसंगी बस बदलूनही प्रवास केला. रस्त्यांवरची गर्दी आणि प्रदूषणात लक्षणीय घट दिसून आली . बसेसची रोज अशी सोय झाली तर बऱ्याच जणांनी रोज बसनी प्रवास करायची तयारी दाखवली .

ट्राफिक आणि प्रदूषणाच्या समस्येचे निवारण करण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाउल तरी यशस्वी ठरले . यावरून पुण्यातील बस सुविधा सुधारू शकली तर बाकी अनेक समस्यांचे निराकरण होवू शकेल अशी आशा धरायला हरकत नाही

No comments:

Post a Comment